अंधारलेल्या खोलीत
अडगळ अस्ताव्यस्त
खिडकीतून शिरू पाहणारा
तिरपा किरण मस्त
पांघरूण पसरलेलं
आळसावलेली दुपार
उत्साहाला आला होता
कंटाळा आज फार
सुट्टी म्हणाली काय हे
असं तुमचं वागणं!
मी म्हणालो नको, नको
नको झालंय जगणं...
रोजरोज पळून पळून
थकला आहे जीव
जगण्यालाच आली आहे
बिचाऱ्याची कीव
कसं हसायचं किती रडायचं
हिशोब काही जमेना
कुठे हरवलं काय मिळालं
मला काही कळेना
निपचित पडलेली नजर
खिडकीपाशी गेली
अन त्या किराणाशी माझी
सहज मैत्री झाली
नकळत माझ्या तो
बोलून गेला शब्द
मीही असाच हरवलो होतो
सकाळ होती स्तब्ध
भटकत भटकत आलो इथवर
बाहेर माझं लक्ख आभाळ
बाहेर माझं लक्ख आभाळ
उठावं लागेल चालावं लागेल ,
जोवर होत नाही संध्याकाळ !
Jabardast
ReplyDeleteखूप छान.... असेच पोस्ट करत राहा
ReplyDeleteखूप मस्त 👌👌
ReplyDeleteNice.. sounds like a weekend story
ReplyDeletechan surekh apratim..!
ReplyDeleteWow! That was real good!
ReplyDeleteApratim khup mast 👌👌
ReplyDelete