फार दिवस झाले काही लिहलं नाही म्हणून कसंकसंच झालं. ब्लॉग उघडून काहीबाही लिहीत बसले. अजिबात जमत नव्हतं.करायला काहीच नाही.काय बेकार आहे आयुष्य! लोक काय काय करतात, आपण कसं जगतोय, किती वाईट झालंय ,मला हे असं नकोय...काहीही वाटायला लागलं.मैत्रिणीला घेऊन चक्कर टाकली तेव्हा खूप गप्पा झाल्या.थोडं मोकळं वाटलं. इतकं पण वाईट नाहीए आयुष्य! एका तासात मत बदललं.किती दिवस जुन्या गोष्टीचं दुखणं घेऊन जगायचं.वाटत होतं,जे आहे ते फार काही वाईट नाही! का म्हणून आयुष्याला दोष देत जगायचं! रस्ताभर विचार करत होते! आयुष्याबद्दल जे काही थोडंफार समजलंय, ते म्हणजे Life is a struggle ! आपण अपेक्षा करतो ते कधी होतं कधी नाही आणि हो !आपण परत अपेक्षा करतो !हे असंच चालू राहतं. कधीकधी अनपेक्षित आनंद होतो तसंच कधीकधी दुःख...हिशोब क्लीअर!हे असं काही आहे जे थांबत नाही...वाहत राहतं ! आणि आपणही वेळेप्रमाणे बदलायचं शिकतो, हा सुखदुःखाचा प्रवास आपल्याला घडवत राहतो.हे असंच असतं! घडून गेलेल्या गोष्टींबद्दल दुःख करण्यात आज का घालवायचा! खाऊच्या बरणीत फसलेला हात सोडवला की दुखायचा बंद होतो अगदी तसं! खरंच जाऊ देणं इतकं अवघड आहे? नक्कीच नाही!उलट ते सुंदर आहे! ती एक सुरुवात असेल आयुष्याच्या एका नव्या पर्वाची!जिथे माझ्याकडे फार विशेष काही नसलं तरी अनुभव असतील, काय करावं हे माहित नसलं तरी काय करू नये हे माहित असेल. तेच खूप महत्वाचं असतं नाही? काय करावं असं आदर्श चित्र सगळ्यांना माहित असतं. पण काय काय करू नये असं सुचत नाही पटकन! ते अनुभवानेच मिळत असावं. जेव्हा आपल्याकडे काही नसतं , तेव्हा अनुभव असतो म्हणतात ते खोटं नाही! तर "don't blame just play the game" attitude सोबत पुन्हा मार्गाला लागावं म्हणतेय! काय माहित काय मिळेल! काम मात्र करत राहावं लागेल.खूप खूप अपेक्षा कराव्या लागतील ,खूप खूप वाईट वाटावं लागेल, खूप खूप अनपेक्षित घडावं लागेल,असेच अनुभव यावे लागतील...मग तर शिकेन ना मी ! मग कुठे चूक-बरोबर समजेल,म्हणजे जे झालं ते चूक नाहीच मुळी! It was a part of a plan! okay...!
तर हे आहे आयुष्य! विषय मिळत नाही म्हणता म्हणता अख्खा परिच्छेद लिहायला लावणारं, मला नको नको वाटत असताना जगायला शिकवणारं! नाही नाही म्हणत म्हणत सगळं काही देणारं! खूप परीक्षा बघणारं, कधीतरी बक्षीससुद्धा देणारं...किती छान आहे हे सगळं! खरंच खूप छान आहे , नाही का?
आयुष्य म्हणजे ,
रोज एक नवा सूर्य
रोज तोच जुना तारा
नजरेचा खेळ तो खरा
बाकी सारा सारा पसारा ....!
तर हे आहे आयुष्य! विषय मिळत नाही म्हणता म्हणता अख्खा परिच्छेद लिहायला लावणारं, मला नको नको वाटत असताना जगायला शिकवणारं! नाही नाही म्हणत म्हणत सगळं काही देणारं! खूप परीक्षा बघणारं, कधीतरी बक्षीससुद्धा देणारं...किती छान आहे हे सगळं! खरंच खूप छान आहे , नाही का?
आयुष्य म्हणजे ,
रोज एक नवा सूर्य
रोज तोच जुना तारा
नजरेचा खेळ तो खरा
बाकी सारा सारा पसारा ....!
#इतिश्रुती
ताई खूप छान लेख आहे..too good
ReplyDeletethank you Yaseen!
Deleteक्षणात विचार बदलला..! Life is meant to be played..and not be blamed :) Keep playing ;)
ReplyDeleteReally it changed my mind.. always motivate us like this shruti tai..
ReplyDeleteshrutaa! verrry nice
ReplyDeleteNice blog
ReplyDeleteChan
ReplyDelete