"आयुष्यात असं काहीतरी करावं की आयुष्यभर आपल्याला एकदम बाप वाटलं पाहिजे !"डबल सीट चा माझा सगळ्यात आवडता dialogue! खरंच ! बऱ्याचदा वाटतं हे नाही जमणार, ते नाही होणार ; मग अपेक्षा करणंच सोडून देतो आपण ! "समाधानी व्यक्ती हीच सुखी व्यक्ती "च्या शीर्षकाखाली पूर्णविराम देऊन मोकळे होतो. मोठ्ठं स्वप्न मोठ्ठंच राहतं आणि आपण लहान ते लहानच! का नाही घ्यायची उडी ? आपल्या comfort zone च्या बाहेर येऊन एकदाच स्वतःला आजमावून का नाही बघायचं ? फार फार तर काय होईल ? हरून जाऊ !एवढंच ना !हरणं काय असतं ते समजेल तरी ! आणि जिंकलो तर... ! हे जिंकणं म्हणजे तरी काय असतं .... फक्त एक प्रमाणपत्र, आपल्या प्रयत्नांचा पुरावा !मंजिल का असली मजा तो रास्तोमें है !try करण्यात , fail होण्यात तर खरं जगणं आहे ! खुशाल प्रयत्न करा ,निर्लज्ज होऊन हरत रहा ! पण स्वप्नाला विसरू नका !
#KeepGoing!
करत रहा करत रहा
शब्द दोन हे स्मरत रहा
अपमानानं सलत रहा
उशीवर तळमळत रहा
दे झिडकारून जांभईला त्या
रात्र एकटा पोखरत रहा
मातून दे तू संथ बहाणे
उठू देत खडबडून तराणे
तू झुंज तू गुंज
या क्षणांना नाचवत रहा
चढव सुंदर साज आंधीचा
झळकू देत घाम चांदीचा
उगा चालू नको ,कुठे थांबू नको
उंचावरून कधी कोसळून पहा
वात करून नसेनसेची
आतून सगळा पेटत रहा
हरू नको आता विरु नको
तू बनून काजळी उरत रहा
कर एकदा तर्र हितगुज
थुंकून दे या जगाची कुजबूज
थोडाच हो ,जरा वेडाच हो
नशेत तुझ्याच तू झिंगत रहा
करत रहा करत रहा,
शब्द दोन हे स्मरत रहा
#KeepGoing!
करत रहा करत रहा
शब्द दोन हे स्मरत रहा
अपमानानं सलत रहा
उशीवर तळमळत रहा
दे झिडकारून जांभईला त्या
रात्र एकटा पोखरत रहा
मातून दे तू संथ बहाणे
उठू देत खडबडून तराणे
तू झुंज तू गुंज
या क्षणांना नाचवत रहा
चढव सुंदर साज आंधीचा
झळकू देत घाम चांदीचा
उगा चालू नको ,कुठे थांबू नको
उंचावरून कधी कोसळून पहा
वात करून नसेनसेची
आतून सगळा पेटत रहा
हरू नको आता विरु नको
तू बनून काजळी उरत रहा
कर एकदा तर्र हितगुज
थुंकून दे या जगाची कुजबूज
थोडाच हो ,जरा वेडाच हो
नशेत तुझ्याच तू झिंगत रहा
करत रहा करत रहा,
शब्द दोन हे स्मरत रहा
