आता blog लिहायला घेतलाय खरा; पण कुठून सुरुवात करू प्रश्नच आहे !डोक्याभोवती विचारांचं वलय गरगरतंय.हे लिहायचंय, ते लिहायचंय ,अरे हो! तेही लिहायचंय...कधी काही वाटलेलं,अनुभवलेलं,जाणवलेलं...कधी कवितेत तर कधी परिच्छेदात उमटलेलं! माझ्या वहीत जपलेल्या अक्षरांना एक नवी वाट आणि काहीतरी productive केल्याचं समाधान.मी Engineering ला आल्यावर लिहायला कधी लागले खरंच मला माहित नाही. शाळेत असताना निबंध लिहायचे रात्री जागून,खूप मन लावून.ते फक्त लिहून ठेवायचे नाही,तर उगाच वाचायचे.. पुन्हा पुन्हा! आणि दुसऱ्या दिवशीं वाचून दाखवायचा कार्यक्रम असायचा. या सगळ्यात किती आनंद होता! खरोखर एक समाधान होतं , खरं सुख होतं. मराठी दहावीत संपलं आणि माझा छंद.... संपला ?नाही! लपून होता इथेच.. मनाच्या खूप जवळ... आनंद शोधाताना काहीतरी missing असल्याची जाणीव मनात घर करून होती. याने आतून मला भ्वाक केलं आणि मी दचकून जागी झाले. हा आनंद पुन्हा मिळवण्या सारखा दुसरा आनंद असूच शकत नाही :) ! काही औरच गोष्ट आहे ही! का करायचं हे?
विचारांचा परिच्छेद संपतो,रितेपणाच्या पूर्णविरामात…
वळणावर चालण्याची अपेक्षा
वर्तुळ संपल्यावर स्तब्ध उभी असते .. माझ्यासारखीच !
तरी मला लिहायचं असतं , घाटाघाटातून फिरायचं असतं,
रित्या स्तब्धतेत आणि स्तब्ध रितेपणात :)
तरंगणाऱ्या अक्षरांना द्यायचे असतात
मात्रे , उकार काही वेलांट्या.. माझ्या आवडीच्या
जोडायचं असतं चार टोकांच्या चार शब्दांना,
एका ओळीत जरा आडोशाला!
त्या अक्षरांना ओळीचा आणि मला त्यांचा
काही नाही… फक्त आधार ! :)
Khup sundar!
ReplyDeletethank you
ReplyDeleteNice ..good start :)
ReplyDeleteKeep it up kakya
ReplyDeleteNice start shruti. . Keep going
ReplyDeleteApratim...!! yeude aata ek ek..!!
ReplyDeletelol..hoho
ReplyDeletekhupach chhan
ReplyDeletemastt..palnyatach hot gg tujyakade :*
ReplyDeleteजमलंय! 👌
ReplyDeletedhanyawaad! :)
ReplyDeleteअग श्रुती केवढीशी होतीस तू चिमुकली शाळेत असताना आणि आज चक्क स्वतःचा ब्लॉग...
ReplyDeleteOMG खूप कौतुक वाटतंय तुझं, खुपच सुंदर लिहितेयस तू, हे लिखाण असच चालू ठेव... ऑल द बेस्ट....
तुझ्या शाळेतली तुझी एक सिनिअर ताई.
तायडे अगं सेम हियर!
ReplyDeleteहोनप मॅडम खास वाचून घ्यायच्या ते निबंध. जे तू केलयस तेच अगदी मी सुद्धा केलय..
आज आठवणी ताज्या झाल्या हा श्रीगणेशा वाचताना!
ho,Honap madam :)
Deletemast...............
ReplyDeleteNice
ReplyDelete